Yojana Doot: मुख्यमंत्री योजनादूत साठी 50 हजार जागा भरती

yojana doot
yojana doot

Mukhyamantri Yojana Doot: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री योजना दूत साठी ऑफिशियल शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आणि ज्या अंतर्गत महाराष्ट्रातील 50 हजार पदवीधर व्यक्तींना प्रति महिना दहा हजार रुपये शासनाच्या योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी मिळणार आहे.

मुख्यमंत्री योजना दूत अंतर्गत आता ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये योजना दूत भरती प्रक्रिया लवकर सुरू केली जाणार आहे आणि त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे या योजना अंतर्गत महाराष्ट्रातील हजारो युवकांना रोजगार प्राप्त होणार आहे आणि यासाठी 300 कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आलेले आहे.

अनुक्रमणिका

मुख्यमंत्री योजनादूत साठी अर्ज कसा करायचा?

महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेली मुख्यमंत्री योजना दूत कार्यप्रणाली काय आहे, यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील तसेच अटी आणि शर्ती कोणकोणत्या आहेत. महाराष्ट्रातील नागरिक मुख्यमंत्री योजना दूत चा लाभ कसा प्रकारे घेऊ शकतील याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

योजना दूत साठी अर्ज कसा दाखल करायचा आणि अर्ज दाखल करण्यासाठी शासन निर्णय कोणता आहे तसेच अर्ज दाखल करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि कोणत्या लाभार्थ्यांची निवड होणार आहे.

वरील सर्व प्रश्नांसाठी पुढील लेख संपूर्णपणे वाचा आणि यामध्ये तुम्हाला योजना दूत प्रणाली बाबत संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे तसेच सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आलेला आहे जेणेकरून तुम्ही पण याचा लाभ घेऊन योजना दूत बनू शकाल.

मुख्यमंत्री योजना दूत 2024 माहिती

महाराष्ट्र शासनाच्या वतीने कौशल्य रोजगार आणि उद्योजकता तसेच नाविन्यता विभागामार्फत आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या अंतर्गत एकत्रितपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यासाठी 9 जुलै 2024 मध्ये शासन निर्णय काढण्यात आला आणि त्या अंतर्गत परवानगी देण्यात आली.

9 जुलै 2024 च्या शासन निर्णयाच्या परिच्छेद क्रमांक सहा अनुसार महाराष्ट्र राज्य मध्ये विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत आणि अशा योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे तसेच संबंधित योजनांचा लाभ जास्तीत जास्त व्यक्तींना मिळावा यासाठी प्रयत्न करणे याकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये 50000 योजना दूत नेमणूक करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्री योजनदूत कार्यप्रणालीचे संपूर्ण अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनामार्फत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय वरती सोपवण्यात आलेले आहे आणि त्या अंतर्गत संबंधित विभागाला योजनादूतांचे रोजगार, मानधन, कौशल्य कार्यक्रम आणि इतर माहिती नाविन्यता विभागाकडून देण्यात येईल तसेच संबंधित उमेदवार निवडीसाठी वेगवेगळे निकष तयार करणे, अटी आणि शर्ती तयार करणे याची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कडे देण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे पार पाडावे यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या अंतर्गत जास्तीत जास्त युवकांना लाभ मिळावा यासाठी सरकार मार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. बऱ्याच वेळेस माहितीच्या अभावामुळे नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये संबंधित योजनांची माहिती देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ही अभिनव कल्पना राबवण्यात येत आहे.

Yojana Doot Shashan Nirnay 2024

महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना योग्य अंमलबजावणी झाली नाही म्हणून नागरिकांना लाभ मिळत नाही आणि अशा विविध योजनांचा प्रचार, प्रसार तसेच प्रसिद्धी करण्यासाठी आणि संबंधित योजनांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांना मिळावा यासाठी 2024 25 च्या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.

याविषयीची अधिक माहिती आणि शासन निर्णय सात जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये आता पुढील अपडेट देण्यासाठी 8 ऑगस्ट 2024 रोजी परत एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. एकूणच महाराष्ट्रातील पदवीधर व्यक्तींना जर जॉब ची गरज असेल तर संबंधित व्यक्ती योजना दूत म्हणून काही काळ कार्य करू शकता.

मुख्यमंत्री योजनदुत उद्दिष्ट

महाराष्ट्र राज्य देशातील एक आर्थिक दृष्ट्या विकास आलेले राज्य आहे महाराष्ट्राचा आर्थिक तसेच सामाजिक दृष्टिकोनातून चांगला विकास झालेला आहे आणि महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्रातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात त्यामुळे योजनदुत उद्दिष्ट पुढील प्रमाणे आहे:

  • महाराष्ट्रातील विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करणे
  • संबंधित योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवने
  • महाराष्ट्रातील पदवीधर बेरोजगार व्यक्तींना काहीसे काम देणे
  • महाराष्ट्रातील शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये शासनाच्या योजनांची माहिती प्रसारित करणे

मुख्यमंत्री योजनादूत विषयी संक्षिप्त माहीती

  • महाराष्ट्र शासन अंतर्गत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने एकत्रितपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबवला जाणार आहे आणि यासाठी शासनांतर्गत कार्यरत असलेल्या प्रशासकीय यंत्रणेला मदत व्हावी यासाठी योजना दूत नेमणूक केली जाणार आहे
  • ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक आणि शहरी भागामध्ये प्रत्येक 5000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत नेमणूक केली जाणार आहे
  • संपूर्ण राज्यभरामध्ये 50 हजार योजना दुतांची नेमणूक करण्यासाठी शासना अंतर्गत प्रयत्न केले जातील
  • मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी १०,००० प्रती महिना एवढे ठोक पेमेंट दिले जाईल ज्यामध्येच सर्व खर्च समाविष्ट करण्यात आलेली आहेत
  • ज्या व्यक्तीची मुख्यमंत्री योजनादूत म्हणून नेमणूक करण्यात येईल त्याच्यासोबत सहा महिन्यांचा करार केला जाईल आणि हा करार कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढवता येणार नाही
  • मुख्यमंत्री योजनादूत हे सरकारी नोकरी नाही तसेच ही नोकरी केल्यानंतर सरकारकडे संबंधित नोकरीसाठी दावा किंवा इतर प्रस्ताव व्यक्त केले जाणार नाही यासाठी हमीपत्र द्यावे लागेल

मुख्यमंत्री योजनादूत निवडीसाठी पात्रता निकष

जर तुम्हाला मुख्यमंत्री योजनादूत प्रणाली मध्ये भाग घ्यायचा असेल आणि त्या अंतर्गत काम करायचे असेल तर तुम्ही पुढील पात्रता निकष पार पाडणे गरजेचे आहे त्याशिवाय तुम्हाला संबंधित रोजगाराची संधी प्राप्त होणार नाही.

  1. उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असावे
  2. उमेदवार कोणत्याही शाखेमधून पदवी घेतलेला असावा
  3. संबंधित व्यक्तीकडे संगणकाचे ज्ञान असावे आणि उत्तम कार्यरत मोबाईल असावा
  4. फक्त महाराष्ट्रातील रहिवासी या मुख्यमंत्री योजनादूत मध्ये भाग घेऊ शकतील
  5. आधार कार्ड सोबत लिंक केलेले बँक अकाउंट असावे आणि अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आधार कार्ड असावे

जर तुम्ही वरील सर्व पात्रता निकष पार पाडत असाल तर तुम्हाला मुख्यमंत्री योजनादूत म्हणून काम करता येऊ शकतेम्हणून काम करता येऊ शकते

मुख्यमंत्री योजनादूत आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री योजनादूत साठी काही कागदपत्रे नमूद करण्यात आलेले आहेत जे तुम्हाला तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे.

  1. मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी करण्यात आलेला ऑनलाईन अर्ज.
  2. आधारकार्ड.
  3. आपण पदवीधर असल्याचा पुरावा सांगणारे कागदपत्रे / प्रमाणपत्र इ.
  4. रहिवासी दाखला
  5. बँक अकाउंट डिटेल
  6. पासपोर्ट साईज चे फोटो
  7. हमीपत्र

जर तुम्हाला मुख्यमंत्री योजनादूत साठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही होईल दस्तावेज तयार ठेवा

मुख्यमंत्री योजनादूताची निवड प्रक्रिया

आता आपण ऑनलाईन अर्ज केलेला असेल आणि आपल्याकडे वरील सर्व डॉक्युमेंट असतील तर आपल्याला मुख्यमंत्री योजनादूत निवड प्रक्रिया विषयी माहिती जाणून घेणे गरजेचे ठरते.

  • जे उमेदवार मुख्यमंत्री योजनादूत साठी नोंदणी करतील अशा उमेदवारांची नोंदणी आणि अर्जांच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थेमार्फत करण्यात येईल.
  • जे काही अर्ज प्राप्त होतील ते अर्ज पात्रता निकषांद्वारे योग्य असल्याची खात्री केली जाईल आणि त्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल
  • जे अर्ज ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेले आहेत अशा अर्जांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जे उमेदवार पात्र असतील अशा उमेदवारांची माहिती जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल
  • जेव्हा जिल्हा माहिती अधिकाऱ्याकडे ही माहिती येईल तेव्हा संबंधित अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कौशल्य विकास रोजगार प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या सोबत कार्य करून अर्जांची आणि कागदपत्रांची परत पडताळणी करतील
  • वरील सर्व प्रक्रिया योग्यरीत्या पार पाडल्यानंतर मुख्यमंत्री योजनादूत अर्जदारासोबतच सहा महिन्यांचा करारनामा केला जाईल
  • जिल्हाच्या माहिती अधिकाऱ्याने अर्जदाराची निवड केल्यानंतर त्याला शासकीय योजनांच्या माहिती संदर्भामध्ये मार्गदर्शन आणि समुपदेशन केले जाईल
  • सर्व प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडल्यानंतर ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीमध्ये एक आणि शहरी भागांमध्ये प्रत्येक पाच हजार संख्या मागे एक योजना दूत पाठवण्यात येईल
  • जे आवेदन करणारे व्यक्ती मुख्यमंत्री योजनादूत म्हणून पात्र होतील ते संबंधित भागामध्ये योजनांचे प्रचार आणि प्रसार कार्य करतील
  • सर्व मुख्यमंत्री योजनादूत उमेदवाराकडून एक हमीपत्र घेण्यात येईल त्यामध्ये सध्याचे कामकाज हे शासकीय नोकरी नाही आणि त्यामुळे भविष्यामध्ये यासाठी नियुक्ती प्रक्रिया किंवा हक्क सांगण्यात येणार नाही असे नमूद केलेले असेल

योजनादूताचे कार्य

१) जे उमेदवार मुख्यमंत्री योजनादूत म्हणून पात्र असतील असे उमेदवार जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या संपर्क मध्ये राहतील आणि त्यांच्याकडून वेगवेगळे योजनांची माहिती घेतील.

२) प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनादूत त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी स्वतः जातील आणि ठरवून दिलेले काम पार पाडतील हे त्यांच्यावरती बंधन असेल

३) जेव्हा मुख्यमंत्री योजनादूत विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी ग्राम पातळीवरती करत असतील तेव्हा त्यांना संबंधित यंत्रणांशी समन्वय साधने गरजेचे असेल जेणेकरून घरोघरी माहिती देता येईल

४) योजनादूत दर दिवशी त्यांना जे काम नेमून दिलेले आहे त्या कामाचा तपशील तयार करतील आणि तो ऑनलाइन पद्धतीने अपलोड करतील. म्हणजेच आपण दररोज काय काम केले हे सांगावे लागेल.

५) कोणताही योजनादूत त्याला दिलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा नियमबाह्य कार्यासाठी काम करणार नाही आणि त्याद्वारे गुन्हेगारी स्वरूपाचे किंवा इतर गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेतील.

६) जर योजनादूत गैरवर्तन किंवा गुन्हा करेल तर त्याचा संपूर्ण करार संपुष्टात आणला जाईल आणि त्याला मुख्यमंत्री योजनादूत म्हणून दिलेल्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल

७) जर योजना दूत कोणालाही न सांगता आणि अधिकृतरित्या गैरहजर राहिला किंवा जबाबदारी सोडून निघून गेला तर त्याला मानधन मिळणार नाही

शासकीय यंत्रणेद्वारे नियुक्त केलेल्या प्रतिनिधीची जबाबदारी

  1. महाराष्ट्र राज्यामध्ये विभागीय स्तरावरती संचालक किंवा उपसंचालक हे योजनेवर ते नियंत्रण ठेवतील आणि माहिती अधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेतील
  2. संबंधित कार्याचा आढावा हा विभागीय स्तरावरती घेतला जाईल आणि त्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी हा जिल्ह्याचा नोडल ऑफिसर असेल
  3. जेव्हा मुख्यमंत्री योजनादूत आपली माहिती दैनंदिन कॅलेंडरमध्ये अपलोड करतील तेव्हा ती माहिती माहिती अधिकाऱ्याला तपासावी लागेल.
  4. योजनेचे काम कशा पद्धतीने चालू आहे हे चेक करणे गरजेचे असेल
  5. महाराष्ट्रात सुरळीतपणे सर्व योजनांची माहिती देण्यात यावी यासाठी प्रयत्न करावे लागतील
  6. मुख्यमंत्री योजनादूत यांना दैनंदिन कामांमध्ये मदत करावी लागेल आणि त्यांना मार्गदर्शन करावे लागेल जेणेकरून ग्रामीण स्तरांमध्ये पण या योजनेचा चांगला प्रभावीपणे अंमल होईल

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातील नोडल अधिकारी जबाबदारी

१) मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची निगडित सर्व कामकाजाचे समन्वय साधने आणि प्रभावी अंमलबजावणी करणे

२) प्रत्येक जिल्हा माहिती अधिकाऱ्याकडून दैनंदिन आढावा घेणे आणि त्याला साप्ताहिक स्वरूपामध्ये जिल्हा मुख्यालयाच्या साप्ताहिक अहवालामध्ये विश्लेषण करणे.

३) योजनातून कार्यक्रमासाठी आवश्यक असणारी सर्व प्रणाली बाह्य यंत्रणेद्वारे अहवाल तयार करून घेणे आणि त्यानुसार कोणत्या जिल्ह्याचे काम चांगले चालू आहेत तसेच कोणत्या जिल्ह्याचे काम समाधानकारक नाही हे बघणे.

४) योजनादूतांची निवड, समुपदेशन व निर्देशन आणि संबंधित उमेदवाराला नेमून दिलेले काम योग्य पद्धतीने होत आहे याचा आढावा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून घेणे

५) मुख्यमंत्री योजनादूत यांना त्यांचे मासिक मानधन वेळेमध्ये मिळत आहे की नाही ते चेक करणे आणि याबाबतीत आयुक्तालय याच्यासोबत संपर्क साधून खातर जमा करून घेणे आणि अडचणीचे निराकरण करणे.

मुख्यमंत्री योजनादूत बाह्य यंत्रणाची जबाबदारी

जे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करतील त्यांची नोंदणी करणे आणि त्यांच्या अर्जांची तसेच त्यासोबत जोडण्यात येणारे कागदपत्रांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी जिल्हा माहिती अधिकार यांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणे.

जे उमेदवार मुख्यमंत्री योजनादूत म्हणून निवडून येतील त्यांना जिल्हा माहिती अधिकारी यांच्यासोबत संपर्क साधून समन्वयाने समुपदेशन आणि मार्गदर्शन करणे तसेच कामकाजाचे वाटप इत्यादी बाबतीमध्ये नियंत्रण प्रक्रियेत मदत करणे.

मुख्यमंत्री योजनादूत यांचे काम सुरळीत पद्धतीने चालू झाल्यानंतर त्यांची हजेरी घेणे आणि त्यांना दररोजचे काम सबमिट करण्यासाठी माध्यम उपलब्ध करून देणे.

नोडल अधिकारी यांना जर काही माहिती आवश्यक असलेली तर त्यांना ती माहिती देणे तसेच उपस्थितीबाबत आणि अन्य बाबींचा साप्ताहिक अहवाल त्यांच्यासमोर सादर करणे. मुख्यमंत्री योजनादूत यांचे कार्य कशा पद्धतीने चालू आहे यासाठी अहवाल प्रस्तुत करणे

मुख्यमंत्री योजनादूत यांच्याकडून दररोजच्या कामाचा ऑनलाईन पद्धतीने अहवाल घेणे आणि तो अहवाल पुढे नोडल ऑफिसर माहिती, अधिकारी आणि इतर सर्व सरकारी कार्यालयांमध्ये पाठवणे

मुख्यमंत्री योजनादूत यांना पेमेंट करण्यासाठी जिल्हा अधिकारी यांच्याकडे मानधनाची देयके तयार करून देणे आणि इतर प्रशासकीय बाबी सादर करणे ज्या अंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या शासन निर्णयाद्वारे कार्यपद्धती पार पाडली जाईल आणि यशस्वीपणे योजनेची अंमलबजावणी केली जाईल.

बाह्य संस्थानांना सर्व प्रकारचे तांत्रिक कामकाज करावे लागेल याचबरोबर उमेदवारांचे समुपदेशन आणि निर्देशन करावे लागेल. तसेच संबंधित उमेदवार यांनी दररोज काय काम करायचे आहे त्यांना मानधन किती द्यायचे आहे इत्यादी बाबतीमध्ये मदत करावी लागेल.

मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी खर्च

प्रत्येक मुख्यमंत्री योजनादूत याला प्रति महिन्याला दहा हजार रुपये अनुदान देण्यात येईल आणि सर्व कार्याचे प्रणाली सहा महिने असेल म्हणजेच 60 हजार रुपये प्रति उमेदवार देण्यात येतील त्यानुसार महाराष्ट्रात 50 हजार मुख्यमंत्री योजनादूत भरती करण्याचे ठरवण्यात आलेले आहे.

या सर्व उमेदवारांचा सहा महिन्यांचा खर्च अंदाजे तीनशे कोटीपर्यंत होणार आहे त्यासाठी 9 जुलै 2024 रोजी शासन निर्णयात होणारा सर्व खर्च कौशल्य, रोजगार, उद्योजकता, आणि नाविन्यता विभागामार्फत करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे.

मुख्यमंत्री योजनादूत प्रणाली मध्ये उमेदवारांची निवड करणे त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि पुढील दिशा निर्देशक ठरवून कामाची जबाबदारी पार पाडण्याची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयावरती देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर संबंधित व्यक्तींना मासिक सॅलरी देण्यात येईल.

प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेपर्यंत मुख्यमंत्री योजनादूत यांना नेमून दिलेले जबाबदारी पार पाडावी लागेल आणि त्यानंतर पुढील कार्यपद्धती चालू होईल आणि महाराष्ट्रातील नागरिकांना याचा लाभ मिळेल.

मुख्यमंत्री योजना दूत साठी अर्ज कसा करायचा

जर तुम्हाला मुख्यमंत्री योजनादूत चा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलच्या माध्यमातून अर्ज दाखल करावा लागेल आणि तिथेच तुमचे सर्व कागदपत्रे सबमिट करावे लागतील.

त्यासाठी शासनाच्या वतीने एक नवीन पोर्टल निर्माण करण्यात येत आहे आणि त्या पोर्टल वरती सर्व माहिती व्यवस्थित पद्धतीने टाकण्याची आणि अर्ज करण्याची त्याच बरोबर अर्जाच्या पुढील प्रक्रियेची सुविधा असेल.

1 thought on “Yojana Doot: मुख्यमंत्री योजनादूत साठी 50 हजार जागा भरती”

Leave a Comment