Mukhyamantri Yojana Doot Form: महाराष्ट्रातील 50000 जागासाठी योजनादूत भरती, Online Form

Mukhyamantri Yojana Doot Form: महाराष्ट्र शासनामार्फत विविध सरकारी योजना राबवण्यात येतात परंतु या योजनेची माहिती महाराष्ट्रातील नागरिकांना नसते आणि त्यामुळे संबंधित योजनेपासून नागरिकांना वंचित राहावे लागू शकते.

या सर्व स्थितीचा विचार करून महाराष्ट्रातील नागरिकांना सर्व योजनांची माहिती व्यवस्थित पद्धतीने मिळावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने mukhyamantri yojana doot bharti 2024 करण्याचे आयोजित केलेले आहे.

या अंतर्गत महाराष्ट्रात 50000 जागा वरती योजना दूत भरती केली जाणार आहे आणि प्रत्येक गावामध्ये एक तसेच शहरी भागामध्ये 5000 लोकसंख्येमागे एक योजना दूत नेमला जाणार आहे.

Mukhyamantri yojana doot bharti साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले जातील आणि महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना या योजनेमध्ये भाग घेण्याचे सरकारच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे तसेच या योजनेसाठी शासनामार्फत ३०० कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आलेले आहे.

महत्वाचे मुद्दे:

  1. महाराष्ट्र राज्यामध्ये yojana doot अंतर्गत 50000 जागांची भरती
  2. ग्रामीण भागात प्रत्येक गावात एक आणि शहरी भागात प्रति 5 हजार लोकसंख्या एक योजना दूत नेमला जाणार
  3. योजना दूत योजनेसाठी सरकारचे 300 कोटींचे बजेट
  4. राज्यातील बेरोजगार युवकांना यामुळे काही काळ काम मिळणार

Mukhyamantri Yojana Doot Bharti 2024

योजनेचे नावमुख्यमंत्री योजनादूत योजना
उद्दिष्टराज्यातील नागरिकांना विविध योजनांची माहिती देणे
लाभार्थीमहाराष्ट्रातील बेरोजगार व्यक्ती
बजेट300 करोड
एकूण रिक्त जागा50,000
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाइन अर्ज
वयोमर्यादा१८ ते ३५ वर्ष
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा

Mukhyamantri Yojana Doot Bharti

मुख्यमंत्री योजनादूत योजनेअंतर्गत 50 हजार जागा भरण्यात येणार आहेत आणि प्रति लाभार्थ्याला दहा हजार रुपये देण्यात येतील संबंधित रोजगाराचा कालावधी हा सहा महिने असेल आणि या मध्ये तुम्हाला सरकारच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावे लागेल.

मुख्यमंत्री योजनादूत योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील विविध योजनांची माहिती राज्यातील नागरिकांना मिळावी आणि जास्तीत जास्त नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा तसेच महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना रोजगार संधी प्राप्त व्हावी हे आहे.

सरकारने या जागांची भरती करत असताना स्पष्टपणे सांगितलेले आहे की तुम्हाला ही नोकरी केल्यानंतर या नोकरीसाठी परत दावा दाखवता येणार नाही किंवा हे शासकीय नोकरी नाही.

परंतु तरीही जर तुम्ही सध्या बेरोजगार असाल आणि तुमच्याकडे काही काम नसेल तर तुम्ही पुढील काही महिने हे काम करून पैसे कमवू शकता आणि उदरनिर्वाह चालवू शकतात.

मुख्यमंत्री योजनादूत योजना आवश्यक कागदपत्रे

जर तुम्हाला मुख्यमंत्री योजना दूत अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पुढील कागदपत्रे सादर करावे लागतील.

  1. आधार कार्ड
  2. ऑनलाइन फॉर्म
  3. बँक डिटेल
  4. पदवीधर असल्याचा पुरावा
  5. रहिवासी दाखला
  6. हमीपत्र
  7. पासपोर्ट साईज फोटो

जर तुमच्याकडे वरील डॉक्युमेंट असतील तर तुम्ही मुख्यमंत्री योजनादूत अंतर्गत पात्र असाल आणि तुम्हाला यासाठी केल्यानंतर संबंधित योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

Mukhyamantri Yojana Doot Bharti Online Form Apply

  1. तुमच्याकडे वरती निर्धारित दिलेले सर्व कागदपत्र असणे आवश्यक
  2. Mukhyamantri Yojana Doot ऑफिशियल वेबसाईट वरती जा
  3. वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला Online apply नावाचा पर्याय वरती क्लिक करायचे आहे
  4. तुमच्यापुढे एक फॉर्म उघडेल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरून रजिस्ट्रेशन करायचे
  5. रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण पार पडल्यानंतर परत लॉगिन करून मुख्यमंत्री योजनादूत साठी आवेदन करायचे आहे
  6. आपले नाव, मोबाईल नंबर, आधार डिटेल्स तसेच इतर माहिती व्यवस्थित पद्धतीने भरायचे आहे
  7. आपले बँकेचे तपशील जोडायचे आहे आणि त्यानंतर कागदपत्रे अपलोड करावे
  8. सर्व माहिती व्यवस्थित पद्धतीने भरल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री योजनादूत साठी आपला अर्ज करू शकता

मुख्यमंत्री योजनादूत साठी सध्या फक्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे परंतु भरतीची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही त्यामुळे पुढील काही दिवसांमध्येच भरतीची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज दाखल करू शकला.

मुख्यमंत्री योजनादूत साठी पात्रता निकष

  1. अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षे असावे
  2. महाराष्ट्रातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल
  3. अर्जदार पदवीधर असावा त्यासाठी त्याकडे पदवीचे सर्टिफिकेट असावे
  4. उमेदवाराकडे मोबाईल फोन असावा आणि संगणकाचे ज्ञान असावे
  5. आधार कार्ड सोबत लिंक केलेले बँक अकाउंट असले पाहिजे

Leave a Comment