महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील बेरोजगार युवकांसाठी एक नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे आणि या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेमध्ये नागरिकांना विविध योजनांची माहिती सांगण्यासाठी युवकांची भरती केली जाणार आहे आणि त्यांना प्रति महिना दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालय मार्फत मुख्यमंत्री योजनादूत योजना राबवण्यात येत आहे आणि या योजनेमध्ये 50 हजार जागा भरण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. राज्याच्या प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरती एक आणि शहरी भागामध्ये 5000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत नेमला जाणार आहे.
संक्षिप्त माहिती:
- महाराष्ट्र राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री योजनादूत योजना सुरू
- विविध शासकीय योजनांची माहिती सांगण्याकरिता प्रति महिना दहा हजार रुपये
- राज्यात 50000 जागा भरल्या जाणार
- अर्ज करण्यासाठी मुदत वाढ
मुख्यमंत्री योजनादूत योजना संक्षिप्त माहिती | Yojana doot 2024
योजनेचे नाव | मुख्यमंत्री योजनादूत योजना |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्रातील बेरोजगार युवक युवती |
लाभ | प्रति महिना दहा हजार रुपये |
योजनेचे उद्दिष्ट | महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना विविध योजनांची माहिती पुरवणे |
अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाइन |
ऑफिशियल वेबसाईट | www.mahayojanadoot.org |
मुख्यमंत्री योजनादूत योजना शेवटचा दिनांक : Yojana Doot Last Date
मुख्यमंत्री योजना दूत योजनेसाठी यापूर्वी 14 सप्टेंबर 2024 ही अंतिम दिनांक ठरविण्यात आलेली होती परंतु त्यानंतर त्यामध्ये बदल करून ही दिनांक 17 सप्टेंबर 2024 करण्यात आलेले आहे म्हणजेच तुम्ही 17 सप्टेंबर पर्यंत मुख्यमंत्री योजनादूत योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.
जर तुम्ही आतापर्यंत योजनादूत योजनेमध्ये अर्ज सादर केलेला नसेल तर त्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या प्रक्रियेचा वापर करू शकता आणि त्या माध्यमातून योजनादूत स्कीम मध्ये भाग घेऊ शकाल.
मुख्यमंत्री योजनादूत योजना पात्रता निकष
मुख्यमंत्री योजनादूत | पात्रता निकष |
वयोमर्यादा | 18 ते 65 |
शिक्षण | पदवीधर |
तंत्रज्ञान | संगणक ज्ञान असावे आणि मोबाईल असावा |
रहिवासी निकष | फक्त महाराष्ट्रातील नागरिक पात्र |
बँक | आधार कार्ड सोबत लिंक बँक अकाउंट असावे |
हमीपत्र | आपण दिलेली माहिती सर्व योग्य आहे असे सांगणारे हमीपत्र |
मुख्यमंत्री योजनादूत योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा
जर तुम्हाला मुख्यमंत्री योजनादूत योजनेसाठी अर्ज दाखल करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता आणि जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल आणि प्रति महिना दहा हजार रुपयांची नोकरी प्राप्त होईल. जर तुम्ही वरील सर्व पात्रता निकष पार पाडत असाल तर पुढील प्रक्रियेचा वापर करून तुम्ही योजनादूत साठी अर्ज सादर करा.
- सर्वप्रथम मुख्यमंत्री योजनादूत योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जा – mahayojanadoot.org
- मुख्य पानावरील रजिस्टर बटणावरती क्लिक करा आणि त्यानंतर Youth पर्यायावर क्लिक करा
- अटी शर्ती मान्य असणाऱ्या टिक बॉक्स वरती क्लिक करा
- आपला आधार क्रमांक टाकून व्हेरिफाय करा
- तुमच्या मोबाईल क्रमांक वरती आधारचा ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी टाकून आपला आधार व्हेरिफाय करा
- तुमच्यापुढे तुमच्या आधार कार्डची माहिती दिसेल
- तुम्हाला तुमचा ई-मेल ऍड्रेस टाकावा लागेल आणि त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे
- तसेच तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती भरायचे आहे जसे की तुमच्याकडे मोबाईल आहे का?
- सर्व माहिती व्यवस्थित पद्धतीने भरल्यानंतर रजिस्टर प्रक्रिया पूर्ण करायची आहे
- आता तुम्हाला तुमचे प्रोफाईल पूर्ण करावे लागेल त्यासाठी तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड तसेच इतर शैक्षणिक दस्तावेज असणे आवश्यक आहे
- वय संदर्भात दस्तावेज विचारले जाईल त्यासाठी तुम्ही आधार कार्डचा उपयोग करू शकाल
- तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे आणि योग्य माहिती भरून प्रोफाइल पूर्ण करायचे आहे
- सर्व माहिती भरल्यानंतर Matching jobs नावाच्या पर्यायावर क्लिक करा
- आता आपला जिल्हा, तालुका, गाव निवडा आणि जर तुमच्या गावामध्ये योजना दूत साठी रिक्त जागा असेल तर तुम्ही तिथे Apply बटनावरती क्लिक करून अर्ज सादर करा
मुख्यमंत्री योजनादूत हे राज्य शासनाची एक महत्त्वकांशी योजना आहे आणि जर तुम्ही या योजनेमध्ये आतापर्यंत भाग घेतलेला नसेल तर तुम्ही या योजनेमध्ये अर्ज सादर करू शकता.
जर तुम्ही सध्या कुठेही नोकरीला नसाल आणि तुम्हाला कामाची गरज असेल तर तुमच्यासाठी पुढील काही महिने पैसे कमावण्याची ही एकच चांगली संधी आहे आणि या माध्यमातून आपल्या गावाजवळच नोकरी मिळणार असल्यामुळे त्याचा आपण लाभ घेऊ शकाल.